Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

तपश्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी मोतीबिंदु शस्त्रक्रिया करून दृष्टी देण्याची सामाजिक कार्यकर्ते श्रेणिक खाटेर यांचे कार्य प्रेरणादायी- ज्योतीराम गुंजवटे

करमाळा प्रतिनिधी तपश्री प्रतिष्ठान ‍बुधरानी हॉस्पिटलच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना नेत्ररोग तपासणी करून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून दृष्टी देण्याचे सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर यांचे कार्य प्रेरणादायी आहे असे मत करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी व्यक्त केले तपस्वी प्रतिष्ठान गुरु गणेश दिव्यरत्न गोशाळा दत्तपेठ तरुण मंडळ यांच्यावतीने आयोजित नेत्ररोग तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले तपश्री प्रतिष्ठान, गोसेवा समिती, दत्त पेठ तरुण मंडळ व बुद्रानी हॉस्पिटल, कोरेगाव पार्क पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 27-6-2023 वार – मंगळवार रोजी मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबीर घेण्यात आले. या शिबिरासाठी पुण्यातून बुद्रानी हॉस्पिटल चे डॉ.गिरीश पाटील व त्यांची टीम यांनी आलेल्या रुग्णांची तपासणी केली. यावेळेस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून करमाळा पोलीस स्टेशनचे पी. आय. गुंजवटे साहेब,अहिल्या बाई होळकर समितीचे बाळासाहेब टकले, ज्योतीरामनाना लावंड, उद्योजक आदेश ललवाणी,पवनपुत्रचे पत्रकार दिनेश मडके, ,राष्ट्रवादी चे अरुणजी टांगडे,यांचे सह सामाजिक कार्यकर्ते श्रेणीक खाटेर उपस्थित होते.यावेळेस पुढे बोलताना म्हणाले की श्रेणिक खाटेर यांनी मागे आतापर्यंत 4270 रुग्णाचे यशस्वी ऑपरेशन झाले असून भविष्यात ही करमाळा शहर व परिसरातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे अहवाहन केले. प्रत्येक महिन्याच्या 27 तारखेला बायपास चौक,देवीचा रोड येथे हे शिबीर होणार आहे असे सांगितले.या प्रसंगी बोलताना पी. आय. गुंजवटे यांनी शुभेच्छा देऊन भविष्यात खाटेर यांच्या सामाजिक कार्यास कायम सहकार्य राहील अशी ग्वाही दिली. नुकतेच ऑपरेशन करून आलेले जमीलभाई काझी यांनी पुणे येथील दवाखान्यात खूप चांगल्या सोई असून, स्वछता आहे.ऑपेरेशन खूप छान होतात असे मनोगत व्यक्त केले.तसेच दत्त पेठ तरुण मंडळाच्या वतीने अरुण टांगडे यांनी खाटेर यांच्या कार्याचे कौतुक करून दत्त पेठ तरुण मंडळाचे त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यात कायम सहकार्य राहील असे आश्वासन दिले यावेळी पवनपुत्रचे संपादक दिनेश मडके, अहिल्याबाई होळकर समितीचे बाळासाहेब टकले , उद्योजक आदेश ललवानी,यांनी आपले विचार व्यक्त केले तसेच आयोजकांच्या वतीने सोलापूर जिल्हा मानवधिकार समितीच्या अध्यक्ष पदी दिनेश मडके यांची निवड झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला .आजच्या शिबिरात 57 जणांची तपासणी करण्यात आली असून 28 रुग्ण ऑपरेशन साठी बुद्रानी हॉस्पिटल पुणे येथे रवाना झाले आहे.या शिबिरासाठी जमील काझी, रसिक शेठ मुथा ,नारायण तात्या पवार, गणेश इंदुरे, सुभाष इंदुरे गुलाम गोस , पृथ्वीराज केंगार , दिनेश मुथा, केतन संचेती वैभव दोषी , गणेश बोरा,वर्धमान खाटेर,अनंत मसलेकर,गिरीश शहा, विजय बरीदे,चंद्रकांत काळदाते, संतोष भांड यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमच्या शेवटी दिनेश मूथा यांनी सर्वांचे आभार मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group