ज्या आमदारावर गुन्हेगारीचे आरोप केले त्यांना मंत्रीमंडळात स्थान दिले सरकारची भुमिका दुट्टपी-प्रतापराव जगताप
करमाळा प्रतिनिधी ज्या आमदारावर गुन्हेगारीचे आरोप केले गेले होते त्याच आमदारांना कल्हई करुन नव्याने मंत्रीमंडळात स्थान दिले गेली असल्याची टिका काँग्रेस आय पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी केली. ते मौजे वाशिंबे ता.करमाळा येथिल शाखा उद्घाटन प्रसंगी बोलत होते.यावेळी ओ.बी.सी.विभागाचे सोलापुर जिल्हाध्यक्ष राजेंद्र रुपनवर पाटील, गिरीश शेटे महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तालुका उपाध्यक्ष इकबाल शेख, सरचिटणीस दीपक ननवरे ,दादा पाटील, अमोल पाटील उपस्थित होते.यावेळी अधिक बोलताना श्री जगताप भा.ज.पा.च्या बदलत्या भुमिके विषयी म्हणाले की महाराष्ट्र सरकारचा बहुचर्चित मंत्रीमंडळ कालच पार पडला परंतु हा मंत्रीमंडळ विस्तार करायला तब्बल १ महीन्याहुन अधिक कालावधी उलटला.भा.ज.पा. ने विरोधी पक्षात असताना ज्यांच्यावर ठासुन आरोप केले त्यांच्यांच मांडीला मांडी लावुन आज सरकार स्थापन केले.हि भा.ज.पा.ची दुटप्पी भुमिका संपुर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्यानी बघत आहे.आज बिहार मध्ये काय झाले हे आपणाला सर्वश्रुत आहे.केलेल्या कर्माची फळ ही येणाऱ्या काळात नक्कीच भा.ज.पा. ला मिळणार आहेत.महाराष्ट्रात अती पावसाने हैरान केले तरी ठोस निर्णय घेण्यासाठी आणखी पालकमंत्रीसुध्दा कोणत्याच जिल्ह्याला मिळालेले नाहीत.
ओ.बी.सी.विभागाचे तालुकाध्यक्ष गफुरभाई शेख व अमोल भोंग यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवुन शाखेचे उद्घाटन संपन्न झाले.तद्नंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात छोटेखानी बैठकीचे आयोजन करण्यात आले.यावेळी शाखाध्यक्ष संदीप दादा झोळ,सोमनाथ झोळ,यांनी आपले विचार व्यक्त केले.यावेळी शाखेचे कार्याध्यक्ष आनंद भैय्या झोल, उपाध्यक्ष हणुमंत पवार,सचिव अतुल रणदिवे,सहसचिव असिफ शेख,खजिनदार अमोल भोंग,सहखजिनदार निखिल शिंदे,प्रसिध्दीप्रमुख पै.वाहिद शेख,प्रकाश ढवळे संभाजी पवार, युवराज झोळ, निखिल गायकवाड, धनाजी लोखंडे, निलेश कुलकर्णी, धनाजी डोंबाळे धनाजी झोळ गोपीनाथ झोळ आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गफुर भाई शेख मित्रपरिवाराने तसेच शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
