Wednesday, April 23, 2025
Latest:
करमाळाशैक्षणिक

दत्तकलामध्ये नीट परीक्षा सुरळीत रित्या संप्पन

करमाळा प्रतिनिधी वैदयकिय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक नीट परिक्षा स्वामी चिंचोली(ता.दौंड) येथील दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला इंटरनॅशनल स्कुल(सी.बी.एस.ई) येथील परिक्षा केंद्रावर सुरुळीत पार पडली. ग्रामीण भागातील सर्वाधिक ९३६ विदयार्थ्यांसाठी हे केंद्र देण्यात आले होते. त्यापैकी ८४१ विदयार्थ्यांनी येथे परिक्षा दिली तर ९५ विदयार्थी परिक्षेस अनुपस्थित राहिले.मागील तीन वर्षापासुन ग्रामीण भागातील विदयार्थ्यांची सोय व्हावी या हेतुने स्वामी चिंचोली(ता.दौंड) येथील दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला इंटरनॅशनल स्कुल(सी.बी.एस.ई)मध्ये नीट परिक्षेचे केंद्र देण्यात आले. चालु वर्षी या केंद्रामध्ये परिक्षेसाठी पुणे, सोलापुर, अहमदनगर जिल्ह्यातील ९३६ विदयार्थी मंजुर करण्यात आले होते. बहुतेक विदयार्थी हे बाहेर गावचे असल्यामुळे परिक्षार्थींबरोबर पालकही परिक्षा केंद्राच्या ठिकाणी उपस्थित होते त्यामुळे या ठिकाणी परिक्षा सुरु होण्यापुर्वी मोठी गर्दी झाली होती. संस्थेच्या वतीने पालक, विदयार्थी व वाहनांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती.

विदयार्थी परिक्षा हॉलमध्ये जाण्यापुर्वी तपासणी करण्यात आली. दुपारी दोन वाजता परिक्षा सुरु झाली. ९३६ पैकी ८४१ विदयार्थ्यांनी परिक्षा दिली तर ९५ विदयार्थी अनुपस्थित राहिले. परिक्षेसाठी सुरु व्हावी यासाठी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, उपाध्यक्ष राणा सुर्यवंशी, सचिव प्रा. माया झोळ, केंद्र संचालक दत्तकला इंटरनॅशनल स्कुलच्या प्राचार्या नंदा ताटे, बाह्य परिक्षक संदीप पाटील, व विलास मानकर यांनी विशेष परिश्रण घेतले. दत्तकला शिक्षण संस्थेने पुढाकार घेऊन हे केंद्र घेतल्यामुळे ग्रामीण भागातील पालकांनी समाधान व्यक्त केले.याबाबत दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ म्हणाले, नीट सारख्या परिक्षेसाठी ग्रामीण भागातील विदयार्थी मोठ्या संख्येने अर्ज करत असतात. विदयार्थ्यांची सोय विचारात घेऊन मागील तीन वर्षापासुन स्वामी चिंचोली(ता.दौंड) येथील दत्तकला शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संकुलांमध्ये नीट परिक्षेसाठी मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे विदयार्थ्यांची मोठया प्रमाणात सोय होत आहे. याबद्दल पालक वर्गातुन समाधान व्यक्त केले जात आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group