करमाळा

Tv 9 मराठीचे पत्रकार शितलकुमार मोटे यांना जगदीशशब्द फाउंडेशनचा पुणे येथे राज्यस्तरीय क्रांतिसूर्य पुरस्कार प्रदान

करमाळा प्रतिनिधी Tv 9 मराठीचे करमाळा येथील पत्रकार शितलकुमार मोटे यांना जगदीशब्द फाउंडेशनचा राज्यस्तरीय क्रांतिसूर्य पुरस्कार पुणे येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक पुणे येथे सेवानिवृत्त आय.पी.एस अधिकारी सुरेश खोपडे,आरोग्यदूत मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता माजी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे,नितीन तळपाडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ अधिसभा सदस्य सोलापूर, महादेव वाघमारे ,अध्यक्ष परिवर्तन सामाजिक संस्था व जग बदलणारा बापमाणूस पुस्तकाचे लेखक जगदीश ओहोळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.Tv 9 मराठीचे पत्रकार शितलकुमार मोटे हे करमाळा तालुक्यातील पाथुर्डी गावचे असून ग्रामीण भागात राहून त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली आहे.पत्रकारिता करीत असताना राजकीय,सामाजिक,कृषीविषयक,शैक्षणिक,धार्मिक बाबतीत पत्रकारितेच्या माध्यमातून वार्तांकन केले असून याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान केला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!