Monday, April 21, 2025
Latest:
करमाळाक्रिडा

वैष्णवी पाटिलचे राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत यश – राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

 

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील वैष्णवी कुमार पाटिल हिने गोंदिया येथील राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेत ब्रांझ पदक पटकाविले आहे. या यशानंतर गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.

महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना आणि अमॅच्युअर आर्चरी असोसिएशन गोंदिया आयोजित या स्पर्धेत एकवीस वर्ष वयोगटाखालील इंडियन राउंड मुलींच्या स्पर्धेमध्ये वैष्णवी पाटीलने हे यश मिळविले. गोवा येथे तीन ते बारा नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रीय स्पर्धा होणार आहेत. त्या स्पर्धेत यश मिळविण्याचा विश्वास तिने व्यक्त केला आहे.

वैष्णवी ही श्रीदेवीचामाळ येथील गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता नववीच्या वर्गात शिकते आहे. तर माढा तालुक्यातील मोडनिंब येथे एकलव्य अकॅडमीत प्रशिक्षक विठ्ठल भालेराव यांच्या प्रशिक्षणाखाली मागील वर्षापासून सराव करत आहे.

दरम्यान गोंदिया येथील स्पर्धेत वैयक्तिक प्रकारात ब्रांझ पदक मिळविणाऱ्या वैष्णवीने सांघिक प्रकारात समृद्धी पवार, प्रसाद भांगे यांच्यासह सुवर्ण पदक मिळविले आहे. वैष्णवी ही शिक्षक कुमार पाटिल यांची मुलगी आहे.

तिच्या या यशानंतर सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण माने, गुरुकुलचे संस्थापक नितीन भोगे, मुष्टीयोद्धा खेळाडू ऍड. संग्राम माने यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group