जनतेची कामे करा येणारा काळ राष्ट्रवादीचा करमाळा तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पदाधिकारी निवडीप्रंसगी तालुकाध्यक्ष संतोष वारे यांचे प्रतिपादन
करमाळा प्रतिनिधी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करत असून त्यांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी हातभार लावा’येणारा काळ राष्ट्रवादीसाठी चांगला आहे असे मत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी व्यक्त केले.करमाळा येथील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहात बुधवारी (ता. १९) तालुका राष्ट्रवादीच्या कार्यकारणीत नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. करमाळा तालुक्यात राष्ट्रवादी वाढावी म्हणून तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी केम, वीट, रावगाव अशी मोठी गावे लक्ष केली आहेत. केम मोठे गाव असल्याने येथे पहिल्यांदाच राष्ट्रवादीने शहराध्यक्षाचीही नियुक्ती केली आहे. तर कामोणे, तरटगाव व मांजरगाव या गावातील कार्यकर्त्यांनाही कार्यकारणीत संधी दिली आहे. ‘. यावेळी वीट येथील तेजस ढेरे, केम येथील अभिजित तळेकर व तरटगाव येथील रविराज घाडगे यांची तालुका उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबरोबर सागर कुर्डे यांची केम शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय रावगाव येथील भाऊसाहेब करगळ व मांजरगाव येथील वैभव हुबे यांची तालुका सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी कामोणे येथील सचिन नलवडे यांना कार्यालयीन सरचिटणीस म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वारे यांनी तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील नवीन चेहऱ्यांना संधी दिली असल्याने चर्चेचा विषय बनला आहे.तालुक्यात आपण राष्ट्रवादी वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. नियुक्ती पत्र दिल्यानंतर आपण पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करावे. विरोधीपक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार आदींच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करत आहोत, असेही संतोष वारे यांनी सांगितले. चांगले काम केले तर येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत आपल्याला संधी मिळू शकते, असे नवनियुक्त उपाध्यक्ष ढेरे यांनी सांगितले. सहा वर्षांपासून मी राष्ट्रवादीत काम करत आहे. यापूर्वी शिवसेनेत काम केले आहे. आमदार रोहित पवार यांच्या कामामुळे मी राष्ट्रवादीत आलो. यापुढेही प्रमाणिकपणे राष्ट्रवादीत काम करत राहणार असल्याचे, त्यांनी सांगितले आहे.
