भाजपा नेते गणेश (भाऊ) चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी – भारतीय जनता पार्टीचे नेते,जिल्हा सरचिटणीस तथा सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश (भाऊ )चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुक्यात विविध ठिकाणी शैक्षणिक, सांस्कृतिक ,सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये दिनांक 22 व 23 ऑक्टोंबर रोजी तालुकास्तरीय भजन व शास्त्रीय संगीत स्पर्धांचे आयोजन दत्त मंदिर येथे करण्यात आले,दिनांक 25 ते 30 ऑक्टोंबर दरम्यान करमाळा तालुक्यातील विविध गावात भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे, दिनांक 26 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान बिटरगाव श्री येथे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ह.भ.प किर्तनकेसरी अक्रूर महाराज साखरे – गेवराई, ह.भ.प भागवताचार्य संदीप महाराज खंडागळे -पैठण,ह.भ.प पुरुषोत्तम महाराज पाटील- बुलढाणा, ह.भ.प समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर व ह.भ.प महंत विठ्ठल महाराज शास्त्री- गहीनाथगड यांच्या भव्य अशा कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, तसेच विविध गावांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व धार्मिक ठिकाणी बैठक बाकडे व वृक्षारोपण करण्यात येणार आहे,दिनांक 30 ऑक्टोबर रोजी अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मौजे- झरे या ठिकाणी भव्य निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती गणेश (भाऊ) चिवटे अभिष्टचिंतन सोहळा समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
