आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते नूतन राष्ट्रवादी युवक सोलापूर जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांचा सत्कार
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे करमाळा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना मौजे. शेलगाव (वांगी) येथे त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी नुकतीच निवड झालेले सामाजिक कार्यकर्ते अभिषेक आव्हाड यांचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महाराष्ट्र केसरी चंद्रहास बाप्पू निमगिरे, जेष्ठ नेते आदरणीय विलास दादा पाटील, संभाजी ब्रिगेडचे नितीनजी खटके, उद्योजक अमरजी गदिया, बंडू गुरुजी व जेऊर पंचक्रोशीतील नेते मंडळी उपस्थित होते.
