Thursday, April 17, 2025
Latest:
करमाळा

मा. आ.जयवंतराव जगताप यांचेकडून कष्टकरी, श्रमजीवी वर्गाला दिवाळी फराळ भेट देऊन दिवाळी साजरी

करमाळा प्रतिनिधी   करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी मार्केट यार्ड येथे काम करणारे कष्टकरी, श्रमजीवी व चाळणी कामगार, राखणदार यांना दिपावली निमित्त दिवाळी फराळाचे वाटप करून गोरगरीब लोकांसमवेत दिवाळी साजरी केली . यावेळी सुप्रसिद्ध व्यापारी संतोष गुगळे, अनिल चिवटे, नगरसेवक रामदास कुंभार ( सर ), इलेक्ट्रीक कॉन्ट्रॅक्टर पांडुरंग घरबुडवे, जे .जे . मित्रमंडळाचे अध्यक्ष रमेश (भाऊ )वीर,बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षीरसागर, माजी नगरसेवक दिगंबर रासकर, उद्योजक बाळासाहेब बलदोटा, माजी नगराध्यक्ष जयराज चिवटे , टेंभुर्णी येथील उद्योजक आण्णा बागवाले , दादासाहेब कांबळे, मल्हारी चांदगुडे आदी उपस्थित होते .करमाळा तालुक्यातील राजकीय नेतेमंडळी पैकी सर्वाधीक , सर्वच स्तरातील जनतेचे अफाट प्रेम व लोकप्रियता लाभलेले नेते व मॅग्नेटीक पर्सनॅलिटी म्हणून माजी आमदार जगताप यांची संपूर्ण जिल्हयात ख्याती आहे . जगताप गटाइतके कट्टर , पार्टीसाठी जीव ओवाळून टाकणारे .व निष्ठेचे कार्यकर्ते लाभणे हिच आपली इस्टेट असल्याचे व नेते तयार करण्याची जगताप गट नर्सरी असल्याचे माजी आ .जगताप अभिमानाने सांगतात . जातीपातीच्या पलीकडे जात सर्वसामान्य उपेक्षीत समाजाला बरोबर घेत दिवाळी साजरी केल्याबद्दल उपस्थित सर्व कष्टकरी वर्गातील कामगारांनी माजी आ. जगताप यांनी आपले बद्दल दाखविलेली सद्‌भावना व आस्थेमुळे समाधान व्यक्त केले .

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group