श्रीराम प्रतिष्ठान यांच्या वतीने दिवाळी फराळ कार्यक्रम संपन्न
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरांमध्ये श्रीराम प्रतिष्ठान यांच्या वतीने दिवाळी सणाचे औचित्य साधून करमाळा शहर व ग्रामीण भागातील जनतेसाठी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री मा. सुभाषबापू देशमुख हे उपस्थित होते , यावेळी बोलताना सुभाष बापू देशमुख यांनी गणेश चिवटे व श्रीराम प्रतिष्ठान यांच्या कार्याचे कौतुक केले, व पुढील काळात सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याचे सुचवले . या कार्यक्रमावेळी यश कल्याणी सेवाभावी या संस्थेकडून कोवीड काळामध्ये केलेल्या कार्याची दखल घेऊन श्रीराम प्रतिष्ठानला मानपत्र दिले.
यावेळी प्रास्ताविक भीष्माचार्य चांदणे सर यांनी केले तर गणेश भाऊ करे पाटील मकाई चे संचालक अमोल पवार यांची भाषणे झाली.
यावेळी करमाळा शहर व ग्रामीण भागातील प्रतिष्ठित मंडळीही उपस्थिती होती,यावेळी आभार श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चिवटे यांनी केले यावेळी त्यांनी सुभाष बापू यांच्या सूचनेचे पालन करत पुढील काळात सामुदायिक विवाह सोहळा घेणार असल्याचे सांगितले,हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम प्रतिष्ठान च्या सर्व सदस्य व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले .
