करमाळासकारात्मक

करमाळयाचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या मनाचा मोठेपणा आपल्या वाढदिनी दिव्यांग मुलींना खुर्चीवर बसवुन दिला अधिकारी होण्याचा आनंद

करमाळा प्रतिनिधी गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिव्यांग मुकबधीर मुलींना आपल्या अधिकारी खुर्चीवर बसवुन अधिकारी होण्याचा मान दिला आहे. मनुष्य जन्माने नाही तर कर्माने मोठा होतो आपण आपले ध्येय साध्य करण्यासाठी कष्ट घेऊन रात्रदिवस त्याचा ध्यास घेऊन आपल्या जीवनाचे ध्येय साध्य करणे गरजेचे आहे. करमाळ्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांचा वाढदिवस मूकबधिर शाळेमध्ये विद्यार्थ्याना खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला . यावेळी गटविकास अधिकारी मनोज राऊत म्हणाले की दिव्यांग असतानाही परमेश्वराने त्यांना तिसरी अतेंद्रिय शक्ती परमेश्वराने दिली असल्याने सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या आकलनशक्ती पलीकडची बुद्धी त्यांच्याकडे आहे. त्यामुळे ही मुले आपले शिक्षण साध्य करण्यासाठी करण्यासाठी परिस्थितीपुढे हार मानुन लोटांगण न घालता प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उज्वल यशाच्या दृष्टिकोनातून वाटचाल करणार आहेत त्यांच्या वाटचालीसाठी शिक्षणासाठी आपण सर्वतोपरी सहकारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जगदंबा मूकबधिर शाळा श्रीदेवीचामाळ येथील विद्यार्थी सारिका मरळ आरती चेड यांनी शाळेत गेल्यानंतर मुलींनी छत्रपती शिवाजी महाराजांनी 14 व्या वर्षी घेतलेल्या स्वराज्याच्या शपथेचे छान चित्र काढले होते.त्यांनी काढलेल्या चित्राची फ्रेम करून त्यांनाच भेट देण्यात आले
यावेळी गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांच्या साह्याने भविष्यामध्ये काय होणार याविषयी विचारले असता सारिका मरळने आपण अधिकारी होणार असल्याचे सांगितले तर आरती चेड हिला वडील नसल्याने तिने आईच्या मर्जीनुसार पुढील शिक्षण पुर्ण करणार असल्याचे सांगितले . अशा परिस्थितीमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी पाहिजे ती सहकार्य करू असे त्यांनी सांगितले अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांची मनातील इच्छा गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी पूर्ण करून सारिका मरळ व आरती चेडला आपल्या खुर्चीवर बसून एक दिवसाचा गट विकास अधिकारी होण्याचा सन्मान व आनंद त्यांना मिळवुन दिला आहे. राऊतसाहेबांच्या मनाचा संवेदनशीलपणा हळवेपणा अधिकारी व्यक्तीच्या मनामध्ये असलेला कळवळा व प्रेम यामुळे दिसून आला मुलांना खुर्चीवर बसवुन त्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न काही वेळा पुरतं फक्त का होईना ते पूर्ण केल्याचे समाधान आपणाला वाटत असल्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी सांगितले‌.
.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group