आदिनाथ साखर कारखान्याबाबत पुढील भुमिका ठरविण्यासाठी बचाव समितीची रविवारी शासकिय विश्रामगृह येथे बैठक
करमाळा प्रतिनिधी श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा येणारा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडणे व कारखान्याच्या संदर्भात भूमिका ठरविण्यासाठी रविवार (ता. 19) सकाळी ११ वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह येथे आदिनाथचे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे यांच्या अध्यक्षतेखाली आदिनाथ बचाव समितीची बैठक होणार आहे, अशी माहिती आदिनाथ बचाव समितीचे निमंत्रक महेश चिवटे यांनी दिली आहे.या बैठकीसाठी प्रा. रामदास झोळ, आदिनाथचे माजी संचालक डॉ. वसंतराव पुडे, माजी अध्यक्ष संतोष पाटील, तरटगावचे माजी सरपंच डॉ. अमोल घाडगे, बाजार समितीचे माजी संचालक देवानंद बागल, महेंद्र पाटील, माजी अध्यक्ष शहाजीराव देशमुख, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सवितादेवी राजेभोसले, उपाध्यक्ष रमेश कांबळे, मकाईच संचालक सुभाष शिंदे, प्राचार्य जयप्रकाश बिले उपस्थित राहणार आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली आदिनाथ कारखान्याला इथेनॉल उत्पादनाची परवानगी मिळावी व सहकारी साखर कारखान्याच्या कर्जाला सरकारने कर्ज हमी देऊन भांडवल उपलब्ध करून द्यावे, यासाठी पाठपुरावा करणे व या हंगामात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.
