रामवाडीतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांना धक्का”*
करमाळा प्रतिनिधी रामवाडी येथील संजय मामा शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संदीप गुंजाळ, कैलास पेटकर, दशरथ गुंजाळ यांनी विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांची साथ सोडत शिवसेने मध्ये आज जाहीर प्रवेश केला…आमदार संजय मामा शिंदे यांच्या वागणुकीला कंटाळून हा प्रवेश करत असल्याचे गुंजाळ यांनी सांगितले…काल झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत, मुख्यमंत्री साहेबांनी दिग्विजय दिगंबरराव बागल यांना ताकद देणार असल्याचे सांगितले आणि त्यामुळे आमच्या गावचे प्रश्न सोडविण्यासाठीदिग्विजय बागल व बागल कुटुंबच गावच्या विकासासाठी मदत करू शकतील हा विश्वास असल्याने आम्ही प्रवेश करत आहोत असे त्यांनी नमूद केले.येत्या 20 तारखेला शिवसेना महायुतीचे उमेदवार दिग्विजय दिगंबरराव बागल यांना गावातून भरघोस मत मिळवून देऊ असा विश्वास देखील दिला…
