आमचा नाथपंथी डवरी बहुरुपी समाज शासनाने आम्हाला न्याय द्यावा- साहेबराव शेगर खडकी
करमाळा प्रतिनिधी साहेब आमचा बहुरूपी समाज छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळापासुन शत्रुच्या गोठात जाऊन गुप्त माहिती काढण्याचे काम आमचे पुर्वज करीत होते त्याकाळी राजाश्रय मिळत होता त्यामुळे आमच्या पुर्वजाची उपजिविका चालत होती.सध्याच्या परिस्थितीत आम्हाला कुठल्याही प्रकारचे शासनाकडुन सहकार्य मिळत नसल्याने तसेच जगण्याचे साधन नसल्यामुळे आमची परिस्थिती बिकट झाली आहे.आमचा बहुरूपी समाज सध्याच्या परिस्थितीत समाजाला मनोरंजनाबरोबर समाज घडवण्याचे काम करत असल्याचे बहुरुपी साहेबराव शेगर रा.खडकी बहुरुपी इन्सपॅक्टेरचे काम करीत आहे. आमच्या आजोबाच्या काळापासुन काम करीत असुन आम्हाला घर नाही दार नाही रेशनकार्ड नाही जातीचा दाखला आम्हाला मिळत नाही साठ वर्षाचा पुरावा आमच्याकडे मागत आहे.आमची भटकी जात कुठुन पुरावा आणायचा शासन आमच्याकडे लक्ष देत नाही आमची बहुरुपी कला असुन याला राजाश्रय मिळावा आमच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करावी आम्ही समाजाला दिशा देण्याचे काम करीत आहे.एकतर पोलिसाची लोकांना भिती असल्याने जेथे पोलिस जाऊ शकत नाही अशा वाड्या वस्त्यावर जाऊन गुन्हेगारी कमी करण्याचे काम केले आहे.शासनाने आम्हाला या विभागात मानधनावर तत्वावर सामावुन घ्यावे आमच्या समाजाला न्याय द्यावा अशी मागणी विजय शेगर यांनी केली आहे.
