आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे मा.अध्यक्ष डॉक्टर प्रदीप आबा जाधव पाटील यांचे दुःखद निधन
करमाळा प्रतिनिधी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष कमलादेवी देवस्थानचे ट्रस्टी करमाळा शहरातील प्रसिद्ध डॉ प्रदीप (आबा) जाधव पाटील यांचे नुकतेच दुःखद निधन झाले.आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन संतोष पाटील यांचे बंधू जाधव पाटील हॉस्पिटलचे डॉक्टर रोहन जाधव पाटील, अभिजीत जाधव पाटील यांचे वडील सुन डॉ शिवानी जाधव व अजिंक्य भैय्या जाधव पाटील यांचे ते काका होते. त्यांच्या मागे आई पत्नी दोन मुले भाऊ भावजय पुतणे सुना नातवंडे असा परिवार आहे . अत्यंत प्रेमळ मनमिळावू हसतमुख स्वभावाचे आबा हे सर्पदंशाचे स्पेशलिस्ट गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या आकस्मिक निर्णयामुळे जाधव पाटील परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांचा अंत्यविधी बुधवारी सकाळी 10 वा तरटगाव येथे होणार असून त्यांचे अंत्यदर्शनासाठी करमाळा येथील जाधव पाटील हॉस्पिटलमध्ये अर्बन बँकेच्या शेजारी पार्थिव ठेवण्यात येणार आहे . साप्ताहिक पवनपुत्र परिवाराच्या वतीने आबांना भावपूर्ण श्रद्धांजली
