करमाळा पाटबंधारे विभागातील अधिकारी कर्मचारी यांचेकडून पुन्हा कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याची दारे अडविताना कायदेशीर नियमावली तरतूदींना दिली बगल अखिल भारतीय ग्राहक पंचायत विचारणार जाब-ॲड शशिकांत नरुटे*
करमाळा प्रतिनिधी.संगोबा बंधाऱ्यांचे दरवाजे नियमानुसार टेल टू हेड टाकायला सुरुवात करणार नाहीत तोपर्यंत कार्यालयातून उठणार नाहीत असा पवित्रा आम्ही घेणार आहोत. याकामी जर काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला संपूर्ण पाटबंधारे विभागातील अधिकारी व कर्मचारी जबाबदार राहतील असे मत ॲड शशिकांत मुरलीधर नरुटे अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत ता. करमाळा यांनी व्यक्त केले आहे. संगोबा, पोटेगाव आणि तरटगाव हे सीना नदीवरील कोल्हापूर पध्दतीचे बंधारे असून या बंधाय्राचे पाणी अडविण्याचे कामकाज कायदेशीररीत्या 10 ऑक्टोबरच्या दरम्यान पूर्ण होणे अपेक्षित असते.मात्र यावर्षी सततच्या पावसाने सीना नदी पात्र भरुन पाणी वाहत होते. यामुळे बंधाय्राचे दरवाजे अडविण्यासाठी अडचणी येत होत्या. म्हणून ते कामकाज आजच्या स्थितीत चालू केले आहे.
पाणी अडविण्यासाठी शासन स्तरावरुन नियमावली जाहीर केली आहे. या बंधाऱ्यांची दारे टाकताना टेल टू हेड ही कायदेशीर बाब विचारत घेणे अपेक्षित होते. यासाठी *संगोबा बंधारा हा टेल* ला येतो मध्ये पोटेगाव बंधारा आणि शेवटी तरटगाव बंधारा अशी वर्गवारी आहे.त्यामुळे अगोदर संगोबा बंधाऱ्याची दरवाजे टाकणे आवश्यक आहे. त्यानंतर पोटेगाव बंधारा आणि शेवटी तरटगाव बंधाऱ्याची दारे टाकून पाणी अडविले पाहिजे होते मात्र असे न करता नियम कायदा व टेल टू हेड धोरण न अवलंबता अगोदरच तरटगाव बंधाऱ्याची दरवाजे टाकण्याचा घाट या पाटबंधारे विभागाने घातला असून त्याचा जाब हा उद्या पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात जाऊन विचारला जाणार आहे.यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत ता. अध्यक्ष ॲड शशिकांत मुरलीधर नरुटे त्यांची तालुका कार्यकारिणी व सीना काठचे लाभधारक शेतकरी हे उद्या समक्ष ऑफीस ला जाऊन भेट देणार असल्याचे सांगितले आहे.
