निधन वार्ता

मराठा समाजासाठी झटणारे नेते शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे अपघाती निधन भावपुर्ण श्रध्दांजली

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा पुणे- मुंबई एक्स्प्रेस वेवर अपघाती मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूची माहिती समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मेटे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोठे काम केले आहे. याबरोबर आरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या श्री शिवछत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी त्यांचा आग्रह होता. बीडकडून मुंबईला जात असताना पहाटे 5 वाजताच्या सुमारास त्यांच्या कारला अपघात झाला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केले तेव्हा तेथील डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे जाहीर केले. यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदींनी शोक व्यक्त केला आहे. मराठा समाजासाठी आपले अफाट काम करणारे, अगदी सामान्य परिस्थितीतून येऊन राज्याच्या राजकारणात आपल्या नावाचे दखल घेण्यास लावणारे, विधानपरिषदेमध्ये सतत राज्यातील विविध प्रश्न मांडणारे मा. विनायक मेटे यांचे अपघाती निधन मनाला दुःख देणारे आहे. भावपूर्ण श्रध्दांजली.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group