Monday, April 21, 2025
Latest:
करमाळा

करमाळा भाजपाची स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तिरंगा बाईक रॅली संपन्न

 

करमाळा प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय जनता पार्टी करमाळा यांच्या वतीने करमाळा येथे मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतील हर घर तिरंगा अभियानाच्या जनजागृतीसाठी तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले, या बाईक रॅलीमध्ये सर्व महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले ,या तिरंगा रॅलीमध्ये शहरातील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला, या बाईक रॅली ची सुरुवात किल्ला वेश खोलेश्वर मंदिर येथून करण्यात आली, ही बाईक रॅली पुढे महात्मा गांधी हायस्कूल ,गायकवाड चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, जय महाराष्ट्र चौक ,फुल सौंदर चौक ,स्वामी विवेकानंद चौक, महाराणा प्रताप पुतळा, मंगळवार पेठ, गुजर गल्ली ,मेन रोड, सुभाष चौक ,दत्तपेठ येथून छत्रपती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीचा समारोप करण्यात आला,

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group