करमाळा

करमाळ्याचे सुपुत्र ॲड. कुणाल येवले यांची असिस्टंट लॉ ऑफिसर पदी निवड

करमाळा प्रतिनिधी : करमाळा येथील रहिवासी आणि सध्या पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली करत असलेले ॲड. कुणाल उदय येवले यांची आय.बी.पी.एस. मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून बृहन्मुंबई महानगरपालिका (बी.एम.सी.) मध्ये सहायक विधी अधिकारी, वर्ग-2 (असिस्टंट लॉ ऑफिसर, क्लास-२) पदी निवड झाली आहे. या पदासाठी महापालिकेने दि. ५ डिसेंबर २०२३ रोजी मुंबई येथे परीक्षा घेतली होती त्याचा अंतिम निकाल आज दि. २१ फेब्रुवारी २०२४ रोजी जाहीर झाला आहे. ॲड. कुणाल यांनी वकिली करत-करत अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले आहे. ॲड. कुणाल हे स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ पत्रकार कै. शंकरराव येवले यांचे नातू, ज्येष्ठ पत्रकार व मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विवेक येवले यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष उदय येवले यांचे चिरंजीव आहेत. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!