Thursday, April 24, 2025
Latest:
Uncategorized

कोर्टी आणि वीट जि.प गटातील गावांचा पाण्यासाठी आणि रेल्वे थांब्यासाठी लोकसभा मतदानावर बहिष्कार


करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील कोर्टी आणि वीट जिल्हा परिषद गटातील बहुतांश गावांमधुन आगामी लोकसभा निवडणुकीवर बहीष्कार घालण्याचे ग्रामपंचायत ठराव संमत झालेले असुन, यामुळे तब्बल ५५ ते ६० गावातुन मतदान होणार नाही अशी परिस्थिती आहे. सोलापुरचे जिल्हाधिकारी श्री. कुमार आशिर्वाद यांनी ज्या ज्या ठिकाणी असे बहिष्काराचे निर्णय होत आहे किंवा कळत आहे अशा ठिकाणी जाऊन संबधित मतदारांचे प्रश्न ऐकुन त्यावर तातडीने उपाययोजना करणेचे बाबत सर्व प्रशासन अधिकारी यांना सुचित केले आहे. त्यामुळे सदर बहिष्कार घालणाऱ्या ग्रामस्थांची समजुत काढण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. वस्तुतः एवढया मोठया प्रमाणावर बहिष्कार होण्याचा हा पहिलाच प्रसंग असुन यापुर्वी करमाळा तालुक्यातील रिटेवाडी गावातील लोकांनी बहिष्कार घातला होता. वस्तुतः आम्ही अशा काही गावातील लोकांच्या जनभावना जाणून घेतल्या असता , लोकाच्या मागण्या पूर्ण न झाल्यानेच हा उद्रेक होत आहे. आजची तरुणाई या सर्व गोष्टी स्वतः हाताळत असुन, प्रत्येक गावोगावी बैठकांचे सत्र चालु आहे. पारेवाडी रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाडीचा थांबा मागणी गेली ३० वर्षांपासून होत असुन, मोदी सरकारच्या काळातही रेल्वे एक्सप्रेस थांबली नाहीच , ऊलट चालु असणाऱ्या गाडया बंद करून, सर्वसामान्य ग्रामिण भागातील नागरिकांचे , प्रवाशांचे प्रचंड नुकसान केले असल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भात गेली दोन तीन दिवसां पासुन रेल्वे वरिष्ठ अधिकारी पारेवाडी रेल्वे स्टेशन व परिसरातील नागरिकांशी संवाद साधत असुन,बहिष्कार निर्णय कायम आहे. दिनांक-२६ फेब्रु रोजी पंतप्रधान यांचे हस्ते संपूर्ण राज्यातील रेल्वेचे कामांचे उद्‌घाटन होत असुन , त्याची जय्यत तयारी एकीकडे चालु असताना या कार्यक्रमावर देखिल बहिष्कार घालण्याचा निर्णय केत्तुर आणि परिसरातील नागरिकांनी घेतला आहे. पारेवाडी, गुलमोहरवाडी, भगतवाडी, जिंती, रामवाडी व इतर ठिकाणी रेल्वे गेट च्या ठिकाणी झालेल्या बोगदयाची व रस्त्याची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची झाली असुन , याबाबत नागरिका मधुन तीव्र संताप व्यक्त होत आहे. मग अशा निकृष्ट कामांचे उद्घाटन माननीय पंतप्रधानांनी करूच नये असे सर्वसामान्य नागरिकांना वाटते. लोकांचे मुलभुत प्रश्न जर प्रशासन सोडवत नसेल तर मग मतदान देऊन तरी काय फायदा अशी उदासिनता तयार होत असुन, जवळपास निम्म्या करमाळा तालुक्यात मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे प्रशासनावरील ताण वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे.
बहिष्काराचा निर्णय आमच्या हक्कांसाठी आहे- राजेंद्र भोसले-सरपंच प्रतिनिधी राजुरी
मागण्या मान्य न झाल्यास बहिष्कार होणारच होणार- सरपंच सुनील ढवळे( देलवडी), सरपंच पोपटराव माळशिकारे( गोयेगाव),
सरपंच नवनाथ गायकवाड ( पोमलवाडी), सरपंच सचिन वेळेकर ( केत्तुर), सरपंच प्रतिनिधी पांडुरंग नवले( पारेवाडी)

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group