आमदार. संजयमामा शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला- डिकसळ- कोंढार चिंचोली नविन पुलाचे ५५ कोटींचे टेंडर झाले फायनल.. लवकरच काम होणार चालु
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील तीन जिल्ह्यांच्या सिमेवर असणारा ब्रिटीश कालीन डिकसळचा पुल नुकताच खचला आणि वहातुक बंद झाली.. त्यामुळे प्रवासी नागरिक, विद्यार्थी , शेतकरी व सर्वसामान्यांना पर्यायी मार्गाचा जीवघेणा प्रवास सुरु झाला.. जुन्या पुलाचे डागडुजीची गरज ओळखून पूर्वीच यासाठी २ कोटी रुपये ची तरतुद आमदार. संजयमामा शिंदे यांनी करून ठेवली असुन त्याचेही काम लवकरच चालु होईल.. परंतु याच ठिकाणी आमदार. संजयमामा शिंदे यांनी नविन पुल आपले काळात बांधुन उभा करणेचे जनतेला आश्वासन दिले होते.. आघाडी सरकार मधे सामिल होवुन त्या साठी ५५ कोटी रुपयांची मंजुरी देखिल मिळवली होती.. याकामी तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजितदादा पवार साहेब यांची देखिल मदत घेतली होती, परंतु सरकार अचानक बदलले, कोरोनाचा दोन वर्षाचा काळ यामुळे या नविन पुलाचे काम होईल किंवा नाही असे प्रश्नचिन्ह होते.. परंतु जिगरबाज असणाऱ्या आमदार. संजयमामा शिंदे यांनी आपली ताकद पणाला लावत या कामाचे टेंडर मंजुर करून आणले आहे. लवकरच नविन पुलाचे कामाची टेंडर प्रक्रीया होऊन काम चालु होणार आहे.. याबाबतची माहीती मिळताच करमाळा तालुक्याचे पश्चिम भागातील कार्यकर्त्यानी आनंद व्यक्त केला असुन, संपुर्ण करमाळाकर या कामाचे कौतुक करीत आहेत.. आम्ही आमदार. संजयमामा शिंदे यांचे प्रयत्ना बद्दल आणि जिद्दीला सलाम तर करतोच परंतु आम्ही कायम त्यांचे ऋणात राहु अशी बोलकी प्रतिक्रिया काही जाणकार मंडळींनी दिली आहे.
