पतंजली योग समितीच्या वतीने योगा- प्राणायामचे फिसरे येथे शिबिर संपन्न
करमाळा प्रतिनिधी फिसरे येथे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा च्या वतीने विशेष श्रमदान शिबिर चे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने करमाळा पतंजली योग समितीच्या वतीने योगा- प्राणायाम चे प्रशिक्षण देण्यात आले.
17 ते 23 जानेवारी या कालावधीमध्ये योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थी, प्राध्यापक वृंद तथा गावकरी असे एकूण दीडशे जणांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. प्रशिक्षक म्हणून पतंजली योग समिती करमाळा तालुका प्रभारी बाळासाहेब नरारे सर यांनी काम पाहिले. मार्गदर्शन करतेवेळी ते म्हणाले की, शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, आध्यात्मिक अशा सर्व पैलूंनी आपले आरोग्य सांभाळायला हवे. त्यासाठी शास्त्रशुद्ध योगसाधना व प्राणायाम करायला हवा . प्रत्येक खाजगी व जिल्हा परिषद शाळा, कॉलेज, शासकीय तथा निमशासकीय कार्यालये अशा विविध ठिकाणी मोफत योगाचे प्रशिक्षण देण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
