गजानन सोशल अँड स्पोर्टस क्लब गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी निवडी संपन्न.
करमाळा प्रतिनिधी
गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबचे गणेशोत्सव मीटिंग पार पडली. सदर मीटिंगमध्ये अध्यक्षपदी मेजर अमोल कांबळे यांची सर्वांमध्ये निवड झाली तसेच उपाध्यक्षपदी परमसिंग मल्होत्रा व बाशिद भाई शिकलकर खजिनदार तीर्थराज भांडवलकर सचिव पदी ओम लोकरे मिरवणूक प्रमुख पदी अमित बुद्रुक कार्याध्यक्ष साई पलंगे अशी पद नियुक्ती करण्यात आली आहे. गजानन मंडळाचे हे रोप्य महोत्सवी वर्ष असून मंडळाला पंचवीस वर्षे झाले आहेत. या सर्व पदेधिकाऱ्याचे मंडळाचे वतीने संस्थापक व माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे यांनी सत्कार करून अभिनंदन केले आहे. या मंडळाची स्थापना 14 जानेवारी 2000 मध्ये झाली असून तेव्हापासून गणेश उत्सव सामाजिक उपक्रम तसेच मागील काही वर्षापासून करमाळा शहरात गणेश जयंती हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत असुन हिंदू मुस्लिम बांधवही गुण्या गोविंदाने या मंडळात काम करत असू सर्व धर्मसमभावाचे प्रतीक असल्याचे संस्थापक प्रशांत ढाळे यांनी सांगितले आहे .
