Sunday, April 20, 2025
Latest:
ताज्या घडामोडीसकारात्मक

राज्यातील युवकांना रोजगार देण्यासाठी रिक्त पदे भरण्यासोबत आवश्यक नवी पदे निर्माण करण्याच्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचना

पुणे प्रतिनिधी राज्यातील युवकांना रोजगार देण्यासाठी रिक्त पदे भरण्यासोबत आवश्यक नवी पदे निर्माण करण्याच्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित विभागीय रोजगार मेळावा गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. राज्यातील युवकांना रोजगार देण्यासाठी रिक्त पदे भरण्यासोबत आवश्यक नवी पदे निर्माण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी विविध विभागांना दिल्या.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन करताना म्हटले कि, राज्यात शासकीय स्तरावर ७५ हजार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबत उद्योग क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण आणि छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येत आहे, असे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी केले.

यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार, बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, कोल्हापूरचे परेश भागवत आदी उपस्थित होते. 

चंद्रकांत पाटील पुढे म्हणले कि,  राज्यातील युवकांना रोजगार देण्यासाठी रिक्त पदे भरण्यासोबत आवश्यक नवी पदे निर्माण करण्याच्या सूचना विविध विभागांना देण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात एकाचवेळी ६ ठिकाणी अशा स्वरूपाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील २ हजार ३३ उमेदवारांना आज नियुक्ती पत्र देण्यात येत आहे.

चंद्रकांत पाटील यांनी नवनियुक्त उमेदवारांना आवाहन केले आणि नियुक्ती देण्याची प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्याबद्दल त्यांनी संबंधित विभागाचे अभिनंदन केले आहे. 

बेरोजगारी दूर करणे 

अनुभवी, कुशल मनुष्यबळ प्रशासनात आणणे

राज्याच्या प्रगतीला गती देणे   

कायद्याची आणि शासनाच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी

नागरिकांना सेवा देण्याचे कार्य   
 
अशा महत्वाच्या जबाबदाऱ्या या नवनियुत उमेदवारांच्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

चंद्रकांत पाटील यांनी यांच्या हस्ते यावेळी नवनियुक्त उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आले. 

पुणे विभागात ऊर्जा विभागाअंतर्गत पुणे वीज वितरण कंपनी – ६०कोल्हापूर वीज वितरण कंपनी – १०४, बारामती वीज वितरण कंपनी – १४३, पुणे वीज पारेषण कंपनी – १ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाअंतर्गत पुणे कार्यालयात – ३ कोल्हापूर जिल्हा परिषद येथे – ५

एकूण ३१६ उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group