Wednesday, April 16, 2025
Latest:
करमाळासकारात्मक

शेतकऱ्यांच्या दुधाला प्रतिलिटर. 10 रुपये अनुदान देण्याची म .न.से शहराध्यक्ष नानासाहेब मोरे यांची  मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्याकडे मागणी   

करमाळा प्रतिनिधी
शेतकऱ्याच्या दुधाला दहा रुपये अनुदान देऊन कोरोनाच्या संकटकाळामध्ये शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्याकडे
इमेलद्वारे केली आहे यावेळी नानासाहेब मोरे यांनी दिलेल्या  निवेदनात म्हटले आहे की
“दुधाला प्रतिलीटर 10 रुपये अनुदान तातडीने द्यावे अन्यथा या शेतकऱ्यांच्या हितासाठी व या प्रमुख मागणीसाठी मनसे रस्त्यावर उतरणार आहे.
   तरी राज्यसरकारने 10 रुपये अनुदान तातडीने दयावे,शासनाच्या नियमानुसार गाईच्या दुधासाठी 27 रुपये 50 पैसे तर म्हशींच्या दुधासाठी 34 रुपये दर मिळणे आवश्यक असतानाही खासगी,सहकारी,शासकीय दूध संघांनी दूध दरात मोठी कपात करण्यास सुरुवात केली आहे.
तसेच चीन युरोप व आफ्रिका या देशातील दूध पावडर निर्यात बंद झाली आहे.यामुळे देशात सध्या 1.5 लाख टन दूध पावडर शिल्लक आहे तर राज्यात देखील 50 हजार टन दूध पावडर शिल्लक आहे व तरीही केंद्र सरकारने 10 हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सर्व बाबींमुळे दूध पावडरचा 330 रुपयांवरून 180 रुपयांवर आला आहे.परिणामी दुधाचा दरही 10 ते 15 रु ने कमी झाला आहे.त्यामुळे सरकारने दुधाला 10 रु लिटर प्रमाणे अनुदान द्यावे.दूध पावडरकरीता प्रतिकिलो 50 रुपये अनुदान देण्यात यावे.दूध पावडर बटर व तूप यावरील GST कमी करण्यात यावे. तसेच अनुदानासह केंद्र सरकारने 30 हजार टन. दूध पावडरचा बफर स्टॉक करावा-. दिलीप(बाप्पू)धोत्रे . जिल्हाध्यक्ष म.न.से

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group