दत्तकला’मध्ये संगणक व माहिती तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमास मान्यता- प्रा.रामदास झोळ
करमाळा प्रतिनिधी स्वामी- चिंचोली (भिगवन)येथील दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशन्स च्या महाविद्यालयास माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी व इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक अभिांत्रिकी पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद( AICTE) व राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने आज याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी दत्तकला शिक्षण संस्थेचे दत्तकला ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशन्स हे महाविद्यालय संलग्नित आहे. हे पदवी अभ्यासक्रम सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून कायमस्वरूपी विनाअनुदान तत्त्वावर सुरू करण्यास केंद्र व राज्य शासनाने मान्यता दिली आहे.दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन या महाविद्यालयाचे नॅक या संस्थेने अक्रिडेशन केलेले असून या महाविद्यालयात संगणक अभियांत्रिकी, विद्युत अभियंत्रिकी, यांत्रिकी अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी या अभ्यासक्रमाचे पदवी व पदव्युत्तर(UG &PG) शिक्षण दिले जात आहे. त्याचबरोबर या वर्षी पासून माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी(IT) व इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक अभिांत्रिकी(ELECTRONICS & COMPUTER ENGINEERING) हे दोन पदवी अभ्यासक्रम चालू करण्यास परवानगी दिली आहे.
अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया व शुल्क निश्चिती आणि शिक्षण विषयक कार्यप्रणाली यांचे सनियंत्रण करण्याचे अधिकार महाराष्ट्र शासनाचे तंत्रशिक्षण संचलनालय, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष,प्रवेश नियामक प्राधिकरण,शुल्क नियामक प्राधिकरण यांना राहणार आहेत. या अभ्याक्रमास प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदास झोळ सचिव सौ.माया झोळ यांनी केले आहे.
यामधील इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक अभिांत्रिकी(ELECTRONICS & COMPUTER ENGINEERING) हा अभ्यासक्रम सुरू करणारे दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन हे परिसरातील एकमेव महाविद्यालय आहे .या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागात संगणक विषयांमध्ये पदवी प्राप्त करण्याची संधी राज्यातील विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे. पदवी अभ्यासक्रमाला मान्यता मिळाल्यामुळे हे एक नवीन दालन विद्यार्थ्यांसाठी खुले होणार आहे, दत्तकलाच्या अत्याधुनिक सोयी सुविधांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे, याचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन प्रा.रामदास झोळ यांनी केले आहे.
