दत्त मंदिर ते कोर्ट विश्रामगृहाकडे जाणारा रस्ता जि.प.बा.विभागाकडे नोंद आढळून येत नाही या रस्त्याची जबाबदारी करमाळा नगरपरिषदेची-अभियंता कन्हेरे
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरातील मुख्य रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभाग विश्रामगृहाकडे व कोर्ट कचेरी कडे , यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाकडे जाणारा प्रमुख रस्ता दत्त मंदिर ते विश्रामगृह कोर्ट असा आहे परंतु या रस्त्याकडे करमाळा नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे वारंवार जिल्हा परिषद बांधकाम विभाग त्याची दुरुस्ती करत आहे सदरचा हा रस्ता विश्राग्रहाकडे जात असल्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभाग त्या रस्त्याची दुरुस्ती करत असलेली माहिती शाखा अभियंता एम के कन्हेरे यांनी दिली पुढे कन्हेरे बोलताना म्हणाले, (सदरचा रस्ता 2001 ते2021रस्ते विकास आराखड्यात समाविष्ट नसल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे निधी उपलब्ध होत नाही असे शाखा अभियंता कन्हेरे यांनी सांगितले ) पुढे म्हणाले नगरपालिकेने त्या रस्त्याचं काम केले पाहिजे आम्ही मुरूम टाकून अथवा खड्डे बुजवणे हे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विश्रामग्रहाकडे रस्ता जात असल्यामुळे आम्ही त्याची नेहमी दुरुस्ती करत असतो परंतु तो रस्ता कायमस्वरूपी चांगला होणे गरजेचे आहे त्या रस्त्यावर यशवंतराव कॉलेज महाविद्यालय कोर्ट असा मुख्य हा रस्ता आहे तसेच सदरचा हा रस्ता सुरुवातीला स्वखर्चाने मुरूम टाकून दुरुस्त केला होता नंतर त्या रस्त्याला निधी मिळावा म्हणून आम्ही जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे मागणी केली परंतु तो रस्ता जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येत नसल्यामुळे त्या रस्त्याला निधी कमी मिळाला आणि तो रस्ता आम्ही दुरुस्त केला पावसाळ्यात रस्ता खराब झाला म्हणून अनेक बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या होत्या तरी या रस्त्याची जबाबदारी जिल्हा परिषद बांधकाम विभागाची नसून करमाळा नगरपरिषदची आहे असे शाखा अभियंता एम के कन्हेरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले..
