लोकशाहिर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य समाजाला दिशादर्शक प्रेरणादायी -नितीन खटके
करमाळा-प्रतिनिधी
लोकशाहिर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती निंभोरे येथे मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय कार्याध्यक्ष नितिन खटके यांनी त्यांचे विचार मांडताना सांगितले कि, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात, वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला. करोडो विश्वे दारिद्रय असलेल्या, अर्धवट भिंती व छत असलेल्या खुराड्यात झाला. असे हे अण्णाभाऊ गरिबाचं निरक्षर पोर.!! गावाच्या शाळेत नाव घालण्यासाठी व दुसर्या दिवशी पहिल्याच प्रहरी, शिक्षकाकडून अपमानित होण्यापुरता अण्णाभाऊंचा शाळा व शिक्षणाशी संबंध. तांत्रिक दृष्टया पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अशा अण्णाभाऊंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाटय, लोकनाट्य, कादंबर्या, चित्रपट गीते, पोवाडे, लावण्या, छक्कड, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. अण्णाभाऊ मुंबईत रिकाम्या पोटी राहुन, मराठी माणूस उभा करून, त्यातला मराठी माणूस जागा करीत होते. असे प्रतिपादन खटके यांनी मांडले.
यावेळी राष्ट्रवादी ता.उपाध्यक्ष राकेश पाटील व राष्ट्रवादी पदवीधर संघाचे ता.अध्यक्ष रविदादा वळेकर यांच्या हस्ते लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी दादा कसबे, स्वप्निल नलवडे, ज्ञानेश्वर वळेकर, ईश्वर मस्के, नाथाभाऊ शिंदे, दत्ताभाऊ वळेकर, प्रवीण वळेकर निलेश गवळी, अजित गवळी, दीपक गवळी, सुरज गवळी, अनिकेत गवळी, विजय गवळी, कृष्णा गवळी, खंडेश्वर गवळी, अशोक गवळी, जालिंदर गवळी, अमोल चांदणे, सिद्धार्थ भिसे, साहिल अडसूळ, भाऊ जाधव, पोपट शिंदे, सम्राट जाधव, राजू पठाण, विशाल खाडे आदीजन उपस्थित होते.
