दत्तकलामध्ये बीसीए व एमसीए अभ्यासक्रमास मान्यता – प्रा .रामदास झोळ सर
करमाळा प्रतिनिधी. दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये बॅचलर ऑफ कॉम्पुटर अप्लिकेशन (बीसीए) व मास्टर ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशन (एमसीए) या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास चालू असणाऱ्या शै.वर्ष २०२०-२१. या वर्षापासून मान्यता मिळाली आहे,अशी माहिती दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.प्रा.रामदास झोळ यांनी दिली आहे. बीसीए या अभ्यासक्रमास प्रथम वर्षात प्रवेश घेण्यासाठी कुठल्याही शाखेतून इ.१२ वी उत्तीर्ण असणे किंवा तीन वर्षांचा डिप्लोमा ऊत्तीर्ण किंवा दोन वर्षाचा आय टी आय ऊत्तीर्ण किंवा इ.१० वी नंतर दोन वर्षांचा स्टेट बोर्ड चा व्होकेशनल कोर्स उत्तीर्ण असल्यास प्रथम वर्ष अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो, तसेच थेट द्वितीय वर्ष अभ्यासक्रमास प्रवेश घ्यायचा असेल तर इ.१० वी नंतरचा कॉम्पुटर/आय टी या विभागातून डिप्लोमा उत्तीर्ण असेल किंवा इ.१२ वी नंतर एक वर्ष कॉम्पुटर सायन्स/ आय टी/कॉम्पुटर अप्लिकेशन या विषयातील प्रथम वर्ष ऊत्तीर्ण असेल तर थेट द्वितीय वर्ष बीसीए अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो.त्याचप्रमाणे, एमसीए प्रथम वर्ष अभ्यासक्रमास प्रवेश घ्यायचा असेल तर नामांकित विद्यापीठाची तीन वर्षाची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इ.१२ वी गणित विषयासह इ.१२ वी ऊत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि एमसीए थेट द्वितीय वर्ष अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावयाचा असेल तर तीन वर्षाची कॉम्प्युटर सायन्सच्या संबंधित पदवी ऊत्तीर्ण किंवा बी.ई(कॉम्प्युटर/आय.टी) किंवा बी.टेक (कॉम्पुटर सायन्स/आय टी) मधील पदवी उत्तीर्ण असेल तर एम सी ए थेट द्वितीय वर्ष अभ्यासक्रमास प्रवेश मिळतो. बीसीए व एमसीए या अभ्यासक्रमाचे प्रवेश ३१ऑगस्ट पर्यत करावयाचे असल्याने विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर महाविद्यालयाशी संपर्क करून आपला प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन प्रा.रामदास झोळ यांनी केले आहे.