आ.रोहितदादा पवार विचारमंच महाराष्ट्र प्रदेश सदस्यपदी मोरवडचे महेश काळे यांची निवड.

करमाळा प्रतिनिधी आ. रोहितदादा पवार विचार मंच महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश सदस्य पदी मोरवड येथील युवा कार्यकर्ते महेश जिजाबराव काळेे पाटील यांची नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजु पाटील-बोंबले यांनी नियुक्ती पत्र देवुन हि निवड केली आहे. महेश काळे पाटिल हे राष्ट्रवादी कॉंग्रेस चे कट्टर कार्यकर्ते असून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे ता. सचिव, जिल्हा सरचिटणीस , व जिल्हा उपाध्यक्ष पदावर त्यांनी काम केले आहे. या निवडीबद्दल सुनंदाताताई पवार, आ. रोहितदादा पवार ,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाअध्यक्ष संतोष वारे , आ.रोहित पवार विचारमंचचे तालुकाअध्यक्ष तेजश ढेरे यांनी अभिनंदन केले आहे.
