करमाळा

पारधी समाजाला गुन्हेगारी पासून मुक्त करून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून पहाट प्रोग्राम कार्यक्रम-पोलीस निरीक्षक रणजीत माने

करमाळा प्रतिनिधी पारधी समाजाला गुन्हेगारीपासून मुक्त करून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून पहाट प्रोग्राम कार्यक्रम ‌ असल्याचे मत करमाळ्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक  रणजित माने यांनी व्यक्त केले आहे. श्री अतुल कुलकर्णी सर यांचा ड्रीम प्रोजेक्ट असून त्याचे नाव पहाट प्रोग्रॅम आहे. त्याची संकल्पना अशी आहे की पारधी लोकांच्या जीवनात एक चांगली पहाट यावी यासाठीचा हा उपक्रम आहे यामध्ये पारधी समाजाची सामाजिक व आर्थिक सक्षमता वाढविणे त्यांचे शिक्षण यांचे आरोग्य त्यांना उद्योगधंदे करण्यास प्रवृत्त करावे ही संकल्पना आहे..करमाळा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पहाट कार्यक्रमाचे अनुषंगाने जिंती बीट मधील भगतवाडी या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आम्ही स्वतः तसेच बीट अधिकारी पोलिस उपनिरीक्षक संदीप बनकर..अमलदार व पंचायत समिती करमाळा येथील स्टाफ, समाज कल्याण विभागाचे स्टाफ सरपंच, ग्रामसेवक,तलाठी,पोलीस पाटील यांचे उपस्थितीत पारधी समाजाच्या लोकांची बैठक घेण्यात आली ..
सदर बैठकीसाठी 50 ते 60 पारधी समाजाचे पुरुष स्त्री मुले हजर होती त्यांना आम्ही गुन्हेगारी पासून परावृत्त होऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चोऱ्या अवैध दारू.. विक्री करू नये असे सांगून शासनाकडून मिळणाऱ्या योजनांचे मार्गदर्शन केले आहे.
पंचायत समिती करमाळा येथील पंचायत समितीचे वरिष्ठ सहाय्यक श्री दिनेश काळे यांनी त्यांना शबरी आवास योजना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या योजना समजावून सांगून त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड, अपंगाचा दाखला, रहिवासी दाखला, डोमीसाईल, सर्टिफिकेट,जागेचा उतारा, इत्यादी बाबत माहिती देऊन ती कागदपत्रे कशी काढायची याबाबत मार्गदर्शन केले आहे.समाज कल्याण विभागाचे कनिष्ठ सहाय्यक श्री गोरख खंडागळे यांनी पारधी समाजासाठी असणाऱ्या सात योजना त्यामध्ये मागासवर्गीयशेळीपालन,,शिलाई मशी झेरॉक्स मशीन, अपंगासाठी शेळीपालन,पिठाची गिरणी, अपंगासाठी असणारी स्कुटी, इत्यादी बाबत मार्गदर्शन करून त्यासाठी मिळणारे अनुदानाबाबत व कागदपत्र बाबत माहिती दिली केंद्रप्रमुख श्री गोरे अंगणवाडीच्या उर्मिला गुंजाळ यांनी पारधी समाजाचे मुलांना शिक्षणापासून वंचित न ठेवता त्यांना शिक्षण घेणेबाबत सांगून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच शिक्षणासाठी शासनाकडून मिळणारे योजनांची माहिती दिली . पारधी समाजाची सामाजिक व आर्थिक सक्षमता वाढविणे त्यांचे शिक्षण यांचे आरोग्यसंपन्न होऊन उद्योगधंदे करण्यासाठी पुढे यावे ही संकल्पना आहे.जास्तीत जास्त पारधी समाजातील युवकानी शिक्षण घेऊन उद्योग व्यवसाय करावा व गुन्हेगारीतून‌‌ मुक्त होऊन निकोप समाज निर्माण करण्यासाठी कटिबद्ध रहावे असे आवाहन करमाळ्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!