शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.शिवाजी सावंत सरांचा राजीनामा मागे घेऊन पक्षांनी त्यांना ताकद द्यावी अन्यथा पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत-निखील चांदगुडे
करमाळा प्रतिनिधी शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत सरांनी पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढीसाठी प्रामाणिकपणे काम केले असून पक्षात असणाऱ्या अंतर्गत गटबाजीमुळे त्यांनी राजीनामा दिला आहे त्याची पक्षाने तात्काळ दखल घेऊन प्रा. शिवाजी सावंत सरांचा राजीनामा तात्काळ मागे घेऊन त्यांना पक्षाने मोठी ताकद द्यावी असे मत शिवसेना जिल्हा समन्वयक निखिल भैया चांदगुडे यांनी युवा सेना संपर्क कार्यालय करमाळा येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना व्यक्त केले. या पत्रकार परिषदेला भटक्या विमुक्त जाती जमाती शिवसेना जिल्हा प्रमुख सुयश करचे युवा सेना जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत गोसावी, युवा सेना तालुका प्रमुख नवनाथ गुंड, युवा सेना शहर प्रमुख नागेश गुरव, युवा सेना शहर उपप्रमुख अनिकेत यादव, युवा सेना तालुका उपाध्यक्ष ज्योतीराम काळे, युवा सेना तालुका उपाध्यक्ष श्रीकृष्ण शिंदे, शिवसेनेचे नेते धनंजय ढेरे शिवसेना उपतालुकाप्रमुख दादासाहेब थोरात उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना निखिल भैया चांदगुडे म्हणाले की शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी प्रा. शिवाजी सावंत सर यांनी जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून यशस्वीपणे काम केले आहे. पक्षीय राजकारणात त्यांनी शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी काम केले असल्याने आम्ही कार्यकर्ते त्यांच्या विचाराचे पाईक म्हणून काम करत आहोत. त्यामुळे अंतर्गत गटबाजीमुळे त्यांनी राजीनामा दिल्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्त व्यथीत झाले असून पक्षप्रमुख व संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्राध्यापक शिवाजी सावंत यांची समजूत काढून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणुकांसाठी त्यांना ताकद द्यावी आम्ही कार्यकर्ते मनापासून दिलेल्या आदेशाचे पालन करून काम करणार आहोत.अन्यथा सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे मत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे यांनी सांगितले आहे.



