श्री मकाई सहकारी साखर कारखाना उमेदवारी अर्ज छाननी पूर्ण 36 अर्जावर अंतिम निकाल 22 मे रोजी होणार
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दाखल झालेल्या बहुतांश अर्जावर मकाई अदिनाथ अपूर्ण शेअर्स सलग तीन वर्ष ऊस गाळपास नाही तीन अपत्ये व थकीत असलेबाबतचा दाखल असे आक्षेप आले आहेत. मोहिते पाटील समर्थक जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सवितादेवी राजेभोसले, प्रा. रामदास झोळ, बाळासाहेब पांढरे, रामभाऊ हाके, सुभाष शिंदे बागल गटाचे काही समर्थकांबाबत आदींसह ३६ अर्जावर अक्षेप आले आहेत.आक्षेपांवर आज सुनावणी झाली पण त्याचा निकाल हा राखून ठेवण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोंपे यांनी सांगितले आहे. सदर निकाल 22 मे रोजी जाहीर केला जाणार आहे. सकाळी 11 वाजल्यापासून तहसील कार्यालयात छाननीला सुरुवात झाली होती. सुरुवातीपासून सर्व गटाच्या हरकती ऐकून घेतल्यावर व त्यावर तीन वाजल्यापासून सुनावणी करण्यात आली. तर त्याकाळात सर्व उमेदवार तिथेच वाट पाहत होते. सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्वांच्या सुनावण्या पूर्ण झाल्या निकाल मात्र राखून ठेवण्यात आला आहे.