करमाळयाचे माजी नगराध्यक्ष वैभवराजे जयवंतराव जगताप यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश
करमाळा प्रतिनिधी
करमाळा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभवराजे जयवंतराव जगताप यांनी नुकताच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती मिळत आहे. बऱ्याच काळापासून ते काँग्रेसशी संलग्न होते तर काँग्रेसचे नगराध्यक्ष म्हणून त्यांची एक चांगली ओळख निर्माण झाली होती. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नगराध्यक्ष वैभव जगताप व उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी यांच्या हस्ते शिवबंधन बांधले आहे.
वैभवराजे जगताप यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे तालुक्यातील राजकारणाची बरेचशे गणित बदलणार असल्याचे दिसत आहे. काँग्रेसच्या माध्यमातून मागील निवडणुकीत माढा करमाळा विधानसभा मतदार संघ युवक काँग्रेस अध्यक्षच्या निवडणुकीत वैभवराजे जगताप यांची निवड झाली होती. वैभवराजे जगताप यांनी शिवबंधन बांधल्यामुळे आता उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला चांगले दिवस येतील असे जाणकार बोलत आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप यांना मानणार वर्ग शहर व तालुक्यात मोठा आहे. त्यांचे पुत्र वैभवराजे जगताप ठाकरे गटात प्रवेश केला तर दुसरे पुत्र शंभूराजे जगताप भाजपचे काम करीत आहे. आगामी निवडणूक लक्षात घेता जगताप गट सत्तेेच्या राजकारणात काय भुमिका घेणार हा येणारा काळ ठरवणार आहे.
