Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

महाराष्ट्रात कुंकू उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले केम उत्तरेश्वरच्या पावन नगरी असलेल्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करु-प्रा.रामदास झोळ

करमाळा प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रात कुंकू उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले उत्तरेश्वरच्या पावन नगरी असलेल्या केम गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे मत दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळसर सर यांनी व्यक्त केले. केम ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्याच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. केम ग्रामपंचायतच्या निवडणुकीत निवडून आलेल्या सरपंच उपसरपंच नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळसर सर यांनी केम या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय येथे सदिच्छा भेट देऊन नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विकास कामासाठी सर्वांनी एकमेकांना बरोबर घेऊन विकास कामे करावे आपण गावाच्या सर्वांगीण विकास साठी सर्वतोपरी सहकार्य करु असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group