गोंडरे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आ. संजयमामा शिंदे यांचा बालेकिल्ला राखल्याबद्दल सुभाष हानपुडे यांचा भरत भाऊ आवताडे यांच्या हस्ते सत्कार
करमाळा प्रतिनिधी गौंडरे ग्रामपंचायतीची निवडणूक अंत्यंत चुरशीची झाली असून प्रतिस्पर्धी नारायण आबा पाटील गट बागल गट यांचे स्वतंत्र्पॅनल असताना सरपंच पदी उमेदवार उभा होते अशा परिस्थितीमध्येही संजय मामा शिंदे समर्थक माजी सरपंच सुभाष हानपुडे यांनी मागील पाच वर्षांमध्ये गावामध्ये चांगली विकास कामे केल्यामुळे जनतेने त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून यांच्या पत्नी सौ तारामती सुभाष हानपुडे यांची सर्वाधिक 695 मते मिळवून बहुमताने निवड केली आहे ग्रामपंचायत सदस्य पदी संजय मामा शिंदे गटाच्या सो मनिषा अरुण उघडे या 258 मते मिळवुन विजयी झाल्या आहेत. सुभाष हानपूडे यांनी संजय मामा शिंदे गटाचे समर्थक म्हणून आपला बालेकिल्ला राखून ठेवला आहे. सरपंचपदी ग्रामपंचायत सदस्य पदी निवड झाल्याबद्दल संजय मामा शिंदे समर्थक पूर्व भागाचे नेते उद्योजक भरत भाऊ अवताडे यांच्या हस्ते मानाचा फेटा श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. गौंडरे ग्रामपंचायत पारंपरिक पाटील गट बागल गट यांचा बालेकिल्ला असताना गौंडरे ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदी संजय मामा शिंदे गटाचे सुभाष हानपुडे यांच्या पत्नी सरपंच झाल्या असून एक ग्रामपंचायत सदस्य झाल्याने संजय मामा शिंदे गटाने येथे पुन्हा एकदा ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या निम्मिताने आपले वर्चस्व सिध्द केले आहे.
