Saturday, April 26, 2025
Latest:
करमाळा

माझ्या जीवात जीव असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही-मनोज जरांगे पाटील

करमाळा प्रतिनिधी माझ्या जीवात जीव असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही एक डिसेंबर पासून साखळी उपोषण करण्यासाठी गावागावात समाज बांधवांनी तयार राहावे असे आवाहन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी वांगी नंबर एक येथील जाहीर सभेत व्यक्त केले. करमाळा तालुक्यातील वांगी नंबर एक येथे जरांगे पाटील यांची सभा सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आली होती परंतु मराठा समाजाच्या लोकांच्या विनंतीला मान देत करमाळयाकडे येताना आणि गावातील लोकांनी गाडी समोर झोपून आमचा रस्ता अडवून आम्हाला या आरक्षणाच्या लढाई आम्ही आपल्याबरोबर आहोत आता काही झाले तरी आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही . त्यांच्या आग्रहाला आम्ही नाही म्हणू शकलो नाही व सर्वांच्या भेटीगाठी घेत विचार विनिमय करून आशीर्वाद  घेऊन सभेला यायला पहाट झाली  चार वाजले तरी थंडीच्या कडाक्यात आरक्षणासाठी मराठा समाज बांधव शेकोटी घेऊन बसला आहे. ही सभा  ऐतिहासिक असुन आमच्या मनात कायम स्मरणात राहणार आहे. थंडीतही  आपण शेकोटीचा आधार घेत आरक्षणाच्या या लढ्यामध्ये सहभागी झाला याची फळ आपणास निश्चित मिळणार आहे. आता आपली भेट झाली आहे तुमच्या गाठी भेटीसाठी मी आलो होतो आता आपल्या हक्कासाठी आरक्षण  लढातीव्र करण्याची गरज आहे. आपल्या लेकरा बाळांच्या भवितव्यासाठी भावी पिढीसाठी आरक्षण मिळणे ही काळाची गरज असून जोपर्यंत सरकार आरक्षण देत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार असल्याचे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. वांगी नंबर एक येथे सकल मराठा समाजाचे वतीने 171 एकरावर सभेचे भव्यदिव्य नियोजन करण्यात आले होते आलेल्या लोकांना 35000 पाणी बॉटल ची वाटप तसेच म्हणून लाडू चिवड्याचे पाकीट ही लोकांना देण्याची व्यवस्था करण्यात आली होती 35 एकर वर भव्य वाहनासाठी वाहनाचे पार्किंगची सोय करण्यात आली असून जागोजागी गावापासून पाच किलोमीटरच्या परिसरात भगवे झेंडे लाईटची  व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली होती या सभा शांततेत पार पडण्यासाठी करमाळ्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी पोलीस प्रशासनाच्या वतीने चौख बंदोबस्त ठेवला होता. मराठा आरक्षणाच्या या सभा नियोजनामध्ये सकल मराठा जातीबरोबरच सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहकार्य करून सभा नियोजनाच्या ठिकाणी परिश्रम घेऊन आपले योगदान दिले सर्व जातींना बरोबर घेऊन जाणाऱ्या आपला मोठा भाऊ मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही भावना सर्व जातीच्या लोकांमध्ये असल्याने करमाळा तालुक्यात एकतेचे अनोखे दर्शन या सभेच्या निमित्ताने घडले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group