कमलाई मिल्कच्या माध्यमातून दुध व्यवसायाला गत वैभव प्राप्त करून देऊ – डॉ. विशाल केवारे
करमाळा प्रतिनिधी कमलाई मिल्कच्या माध्यमातून दुध व्यवसायाला गत वैभव प्राप्त करून देऊ असे मत कमलाई दुध डेअरीचे डॉ. विशाल केवारे यांनी व्यक्त केले कमलाई मिल्क ऑन्ड मिल्क प्रोडक्ट यांच्या वतीने 5 जुलै रोजी करमाळा व पंराडा तालुक्यातील दूध उत्पादक व दुधसंस्थाचालक यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी बोलताना. डॉ. विशाल केवारे यांनी दुध व्यावसायातील बारकावे समजू सांगितले. दुग्ध यवसाय कसा करावा त्यात सुधारणा कशा करायच्या याविषयी मार्गदर्शन केले .कमलाई मिल्कच्या माध्यमातुन राबविण्यायात येणाऱ्या विविध योजना, वपुढील पाच वर्षाच्या आराखडा सादर केला. त्यांनी सर्वांना दोन वेळेला स्वच्छ व ताजे दूध वेळेमध्ये संकलन करून संघापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी असे आवाहन केले.या माध्यमांतून आपण या दर दुध व्यवसायातील अडचणी दूर करून सर्वांना न्याय मिळवून देणार असते सांगितले.यावेळी परंडा करमाळा दोन्ही तालुक्यातील व पंचक्रोशीतील शेकडो दुध उत्पादक शेतकरी व संस्थाचालक उपस्थित होते. व सर्वाच्यांवतीने डॉ विशाल केवारे यांचा सत्कार नागनाथ तकिक यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सर्वांना स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
