Thursday, August 6, 2026
Latest:
करमाळा

एमआयडीसीचे सोलापूरला स्वतंत्र कार्यालय मंजूर शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांची माहिती आता सांगलीला जाण्याची गरज नाही

करमाळा प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील उद्योजकांना विविध कामासाठी सांगली येथे कार्यालयात जावा लागत होते.सोलापूर जिल्ह्याचे प्रादेशिक कार्यालय सांगली येथे होते.याचा उद्योजकांना त्रास होत होता.यामुळे सोलापूर जिल्ह्यासाठी एमआयडीसीचे स्वतंत्र प्रादेशिक कार्यालय काढावे म्हणजे उद्योजकांना सर्व सोयी एक ठिकाणी मिळतील अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली होती.               मुंबई येथील उद्योजक श्रीकांत पवार यांनी याचा पाठपुरावा केला होतामहाराष्ट्रातील सर्व एमआयडीसी कार्यवाहीत होऊन नवीन नवीन उद्योग उभारणी करावे यासाठी सर्व कागदपत्रे आहे त्या ठिकाणी देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.सोलापूरसह बारामती सांगली सातारा सहसा प्रादेशिक कार्यालयाला मंजुरी देण्यात आली आहे.या सात प्रादेशिक कार्यालय निर्मितीसाठी नवीन 92 पदनिर्मिती करण्यात आली आहेयाचा उद्योजकांना फायदा होणार आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!