Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

सर्वसामान्य जनतेची निरपेक्ष सेवा केल्याने पाटील गटाची विजयाची हॅट्रिक, ग्रामपंचायत निवडणुकीच्या तीनही टप्प्यात आघाडीवर राहून सर्वात जास्त ग्रामपंचायती वर सत्ता हस्तगत-मा.आ.नारायण आबा पाटील

करमाळा प्रतिनिधी पाटील गटाची विजयाची हॅट्रिक, ग्रापमपंचायत निवडणुकीच्या तीनही टप्प्यात आघाडीवर राहून सर्वात जास्त ग्रामपंचायती वर सत्ता हस्तगत केल्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी स्वतः दिली. याबाबत अधिक माहिती देताना मा आ पाटील यांनी सांगितले की सन २०१९ नंतर माझ्या हाती तालुक्याची सत्ता नसतानाही जनतेचा विश्वास कायम टिकून आहे. मी आमदार म्हणून केलेल्या कामांची ही पोचपावती असून मी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. ग्रामपंचायत निवडणुकीच्या या टप्प्यात आमच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी स्वतंत्र तर काही ठिकाणी स्थानिक पातळीवर युती वां आघाडी करून निवडणुका लढवल्या.यामध्ये बहुतांश ठिकाणी यश आले असून सोळा पैकी आठ ग्रामपंचायतीवर आमच्या कार्यकर्त्यांच्या हाती तेथील जनतेने सत्ता दिली आहे. यात जेऊर, चिखलठान, राजुरी, भगतवाडी- गुलमरवाडी, कंदर, रावगाव, कावळवाडी, केम या ठिकाणी सत्ता मिळाली असून गौडरे येथे सरपंच पद वगळता इतर सर्व जागी पाटील गटाचे सदस्य निवडून आल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group