करमाळासहकार

कंदर विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत तिन्ही गटांनी मिळून शेतकरी विकास पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळाल्याबद्दल मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्या हस्ते सत्कार

करमाळा प्रतिनिधी- कंदर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये बागल शिंदे आणि नारायण पाटील गटाने एकत्र येऊन शेतकरी विकास सहकारी पॅनल च्या नावाखाली निवडणूक लढवली त्यामध्ये एकूण 13 जागांपैकी बागल शिंदे नारायण पाटील युतीच्या गटाने नऊ जागांवर निर्विवाद वर्चस्व स्थापित केले. त्याबद्दल विजयी उमेदवार श्री बबन लोकरे, राजकुमार पराडे, सागर शिंदे, रावसाहेब जाधव, उर्मिलाताई जगताप, विजयसिंह जिजाबा नवले, नवनाथ शंकरराव भांगे, विलास केरू माने ,आणि रामभाऊ भगत या विजयी उमेदवारांचा सत्कार आणि स्वागत मकाई सहकारी साखर कारखान्याचे युवा चेअरमन दिग्विजय बागल यांच्या शुभहस्ते बागल संपर्क कार्यालयात संपन्न झाले. यावेळी आदिनाथ चे संचालक नानासाहेब लोकरे, मार्केट कमिटीचे संचालक रंगनाथ शिंदे, मकाई चे संचालक बापूराव कदम, मच्छिंद्र आप्पा वागज ,बाळासाहेब पराडे, गोपाळराव मंगवडे, ब्रह्मदेव आरकिले, भीमराव इंगळे, धर्मा लोकरे ,काकासाहेब शिंदे, सुभाष काका पवार, अण्णा शिंदे, रवी काका गरड, पांडुरंग पराडे ,अजिंक्य काळे, विवेक भोसले, कुबेर शिंदे, विष्णुपंत माने, आणि महादेव जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दिग्विजय बागल यांनी विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. तसेच राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या विद्यमान संचालिका व बागल गटाच्या नेत्या रश्मी दिदी बागल यांनी भ्रमणध्वनीवरून विजयी उमेदवारांचे शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!