Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

श्रीजगदंबा कमलादेवी मंदिर जतन व संवर्धन कामास अमेरिका येथून देणगी जिर्णोद्धार करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी श्रीजगदंबा कमलादेवी मंदिर* ट्रस्ट च्या संयोजकाने श्री कमला देवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या चार महिन्यांपासून कामास सुरुवात करण्यात आली आहे. मंदिर जतन संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून ट्रस्ट चे अध्यक्ष सोमनाथ चिवटे सचिव अनिल पाटील व सर्व विश्वस्त यांनी मदतीचे आवाहन भक्तांकडे केले होते. या आव्हानास प्रतिसाद म्हणून आज गुरूवार दिनांक २८.०३.२०२४रोजी.सौ.प्रेरणा साईनाथ थोरात-लोणकर बोस्टन अमेरिका यांच्याकडून ऑनलाइन देणगी १५०००/-(पंधरा हजार रुपये फक्त)( अमेरिका चलन १५०/-डॉलर्स )
श्रीकमला देवी मंदिर जतन व संवर्धन कामास ऑनलाइन ने देणगी यांच्या कडून प्राप्त झाली आहे.
मंदिर समितीचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, सचिव अनिल पाटील, विश्वस्त डॉक्टर प्रदीपकुमार जाधव पाटील, विश्वस्त डॉक्टर महेंद्र नगरे, विश्वस्त सुशील राठोड विश्वस्त राजेंद्र वाशिंबेकर ,विश्वस्त ॲड. शिरीषकुमार लोणकर प्रशासनाधिकारी महादेव भोसले व्यवस्थापक अशोक गाठे,उपस्थित होते.या निमित्ताने श्रीकमलाभवानी मंदीर जीर्णध्दाराच्या कामासाठी भाविकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन देखील ट्रस्ट च्या माध्यमातून करण्यात आले.
श्री कमलादेवी मंदिर समिती स देणगी दारांना८०जी कलमान्वये आय कर मधून सवलत मिळत आहे . तसेच ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध आहे.संपर्क अशोक गाठे मो. नंबर ९४०४७०८९२४

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group