मा.संजयमामा शिंदे मोटार वाहतूक संस्था मर्या, मांगी यांचे वतीने उद्या पत्रकारांचा कोवीड योद्धा म्हणून सन्मान होणार
करमाळा प्रतिनिधी
संजयमामा शिंदे मोटार वाहतूक सहकारी संस्थेच्या वतीने कोरोना कालावधीमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या करमाळा तालुक्यातील पत्रकारांचा कोविड योद्धा म्हणून उद्या आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते व सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक श्री दिलीप तिजोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान होणार असल्याची माहिती संजयमामा शिंदे मोटर वाहतूक संस्थेचे सचिव श्री सुजित बागल यांनी दिली.हा सन्मान सोहळा पत्रकार दिनाचे औचित्य साधून उद्या दिनांक 14 / 1/2022 रोजी दुपारी 3 वाजता आमदार संजयमामा शिंदे संपर्क कार्यालय करमाळा येथे होणार असून या कार्यक्रमास सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन आमदार संजय मामा शिंदे संपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
