राजमाता जिजाऊचा आदर्श घेऊन महिलांनी वाटचाल करावी- सौ.स्वातीताई फंड
करमाळा प्रतिनिधी स्त्री ही या जगाची जननी असून आजच्या धकाधकीच्या जीवनात स्त्रीला अनेक आघाड्यांवर लढावे लागत असुन कन्या ,माता भगिनी पत्नी अशी भूमिका पार पाडावी लागत असुन राजमाता जिजाऊ यांचा आदर्श घेऊन जीवनामध्ये यशस्वीपणे वाटचाल करावी असे मत नगरसेविका जिजाऊ ग्रुपच्या अध्यक्षा बांधकाम समिती सभापती सौ स्वातीताई फंड यांनी व्यक्त केले. जिजाऊ ग्रुप करमाळा यांच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांची जयंती त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितले की राष्ट्रमाता जिजाऊनीं छत्रपती शिवाजी महाराजांना घडविले त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊन आपले कुटुंब सुखी संपन्न आरोग्यदायी करण्यासाठी कार्यरत राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यानिमित्ताने क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या महिलांचा सत्कार करण्यात आला यामध्ये आदर्श शिक्षिका सुनंदा जाधव प्रज्ञा जोशी, आदर्श माता माया भागवत, योगशिक्षिका साधना जाधव, आदर्श महिला उद्योजक सौ स्नेहा राणे यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास प्रतिक्षा घाडगे सिंधू पवार , रेश्मा शिंदे अनिता साठे,कविता ज्योती मुथ्था, रूपाली राजेभोसले, सताक्षी राजेभोसले, अनुश्री कुलकर्णी, संध्या कट्टमनी, सोनिया राठोड, प्रतिक्षा त्रिंबके, सुनिता त्रिंबके,अक्षरा फंड, प्रतीक्षा बंडीवार, साधना जाधव माया भागवत विजयमाला चवरे, ज्योती फरतडे ,स्नेहा राणे यांच्यासह जिजाऊ ग्रुपच्या सर्व सदस्या व करमाळा शहर व तालुक्यातील महिला उपस्थित होत्या.
