Sunday, September 20, 2026
Latest:
करमाळासकारात्मक

पवित्र हज यात्रेला जाणाऱ्या अमजद घोडके अतिक बेग यांचा श्रेणिक खाटेर यांच्या मित्र परिवाराच्यावतीने सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथून पवित्र अशा हज यात्रेसाठी जाणाऱ्या अमजद घोडके व त्यांचा परिवार व तसेच आतिक बेग व त्यांचा परिवार यांचा समाजिक कार्यकर्ते श्रेणीकजी खाटेर  त्यांच्या मित्र परिवारच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी बोलतानी श्री श्रेणिक खाटेर यांनी हज यात्रेचे किती महत्व आहे हे आपल्या मनोगनातून व्यक्त केले यात्रेला जायच्या अगोदर   कुणाचे मन दुखावले असेल वाईटपणा आला असेल अश्या सर्वाची माफी मागूनच यात्रेला जावे लागते तसेच तेथे गेल्यावर ही झाडाचे पान न तोडता कोणत्या ही जीवजंतू ला त्रास होऊ द्यायचा नाही असा त्यांचा नियम आहे असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी सुभाष काका बलदोटा, मुन्ना भाई काझी, गिरीश शाहा, जमील भाई काझी, सादिक भाई शेख, विजय बरीदे, वर्धमान खाटेर, प्रवीण गंधे, प्रीतम राठोड, अभय शिंगावी यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते ॲडवोकेट संकेत खाटेर यांनी आभार मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!