गणराया पाठोपाठ सोनपावलांनी गौरी महालक्ष्मीचे केत्तुरमध्ये आनंदात उत्साहात स्वागत

राजाराम माने
केतूर प्रतिनिधी गणराया पाठोपाठ बुधवार (ता.२५) रोजी सोनपावलांनी गौरी अर्थात महालक्ष्मीचे दुपारी १ वाजून ५८ मिनिटे या शुभमुहूर्ता नंतर आगमन झाले.कोरोना महामारीचे संकट डोक्यावर घोंघावत असतानाही गौरींच्या स्वागतासाठी महिलामंडळी मात्र उत्साही होत्या.मात्र यावर्षी गौरी पुढील देखावे व झगमगाटाला आला फाटा देण्यात आला होता.गौरी आगमनाचेवेळी महिलांनी आवर्जून मास्कचा वापर केल्याचे दिसून आले.
गौरी महालक्ष्मीचा हा सण तीन दिवस घरोघरी उत्साहाने साजरा होत असतो पहिल्या दिवशी गौरीचे आगमन दुसऱ्यादिवशी गौरीपूजन तर तिसर्या दिवशी गौरी विसर्जन होते तीन दिवस अगदी उत्साहाचे वातावरण असताना तिसऱ्या दिवशी गौरीचे विसर्जन होत असल्याने महिला मंडळीसह कुटुंबाला हुरहुर लागून राहते.
बुधवार (ता.२५ )रोजी गौरी आगमनाचा मुहूर्त दुपारी १:५८ असल्याने सकाळपासूनच महिला मंडळीची गडबड सुरू होती.मुहूर्ता वेळी महिला मंडळींनी एकत्रित येऊन घरोघरी गौरीचे आगमन केले यावेळी बच्चेकंपनीनी पराती तसेच घंटी वाजविली बच्चेकंपनीचा उत्साह मात्र मोठा होता. गौरी तीन दिवस मुक्कामी राहणार आहेत.गौरी आगमनादिवशी गौरींना भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखविला गेला.गुरुवारी पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो.यावर्षी प्रत्येक सणावर कोरोनाचे संकट असल्यामुळे गौरी हि त्याला अपवाद राहिल्या नाहीत त्यामुळे गौरीपुढे कोणतीही सजावट देखावे,लाईट डेकोरेशन आदिना फाटा देऊन अतिशय साध्या पद्धतीने गौरींची मनोभावे पूजा करण्यात येऊन देशावर तसेच राज्यावर आलेले कोरोनाचे संकट लवकर दूर कर अशी गौरीपुढे साद घालण्यात आली.

केतूर (ता.करमाळा):त्याच उत्साहात गौरींचे आगमन करताना महिला मंडळी.
(छायाचित्र :राजाराम माने,केतूर)
