कुकडीचे ओव्हरफ्लोचे पाणी व निमगाव-गांगुर्डी तलावाचे पाणी सिना नदीद्वारे सिना कोळगाव धरणात सोडण्याची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे दिग्विजय बागल यांची मागणी.

करमाळा प्रतिनिधी कुकडीचे प्रकल्पाचे ओव्हरफ्लोचे पाणी आणि निमगाव-गांगुर्डी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या तलावातील पाणी सिना नदीव्दारे सिना-कोळगाव धरणात सोडण्यात यावे अशी मागणी मुबंई येथे राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब यांना प्रत्यक्ष भेटून मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते दिग्विजय भैय्या बागल यांनी निवेदनाद्वारे केली आहे. करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून आजपर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्याने तालुक्यांमध्ये माणसाच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे.करमाळा तालुक्यातील मांगी तलाव गत सहा वर्षांपासून न भरल्यामुळे अंदाजे २५ गावातील जनावरांच्या व माणसाच्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे.त्यामुळे नगर जिल्ह्यातील निमगाव गांगुर्डी तलाव पुर्ण क्षमतेने भरल्याने अतिरिक्त पाणी करमाळा तालुक्यातील सिना नदीद्वारे सिना-कोळगाव धरणात सोडल्यास तालुक्यातील पुर्व भागातील अनेक गावातील जनावरांच्या व माणसाच्या पिण्याच्या पाण्याची सोय होऊन पाणी टंचाई दूर होईल.
कुकडी ओव्हरप्लोचे पाणी मांगी तलावासोबतच आपल्या तालुक्यातील रावगाव, भोसे, वीट, कुंभेज, कुंभारगाव, हिंगणी, पोंधवडी, पारेवाडी, सावडी, राजूरी या तलावात सोडण्यात यावे अशी ही मागणी निवेदनाव्दारे दिग्विजय भैय्यांनी केली. जलसंपदामंत्री जयंत पाटील साहेब यांनी यावर सकारात्मक भूमिका घेत प्रशासनास त्वरीत सूचना केल्या आहेत. त्यामुळे लवकरच कुकडीचे पाणी आणि सिना नदीव्दारे सिना-कोळगाव धरणाला पाणी मिळणार आहे.
