Thursday, April 17, 2025
Latest:
करमाळाताज्या घडामोडीसामाजिक

प्रहार’ला खिंडार; महिला जिल्हाध्यक्ष वंदना पंतचा ‘जनशक्ती’ मध्ये प्रवेश

 

करमाळा प्रतिनिधी
प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षा वंदना पंत यांनी प्रहारला सोडचिठठी देत शेतकरी नेते अतुल खूपसे पाटील यांच्या संघटन कौशल्य व चळवळीकडे आकर्षित होत शेकडो महिलांसह जनशक्ती संघटनेमध्ये प्रवेश केला असून यामुळे प्रहार संघटनेला खिंडार पडल्याचे बोलले जात आहे.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख बाबाराजे कोळेकर, सोलापूर जिल्हाध्यक्ष नितीन जगताप, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरुण भोसले, पंढरपूर तालुक्यातील युवक अध्यक्ष गणेश ढोबळे, महाराष्ट्र मार्गदर्शक बापुराव मोहिते, रवी गंभिरे, दादा पाटेकर, सुनील मुंडफणे, नागनाथ फरतडे, सुहास फरतडे, अक्षय महाडीक यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकरी, विद्यार्थी, ऊसतोड कामगार, ऊस वाहतूकदार, मत्स्यव्यवसायदार यांच्यासाठी अतुल खूपसे पाटील यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेत या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी अथवा कारखानदारांच्या दारात आंदोलन उभे केले आहे. न्याय मिळाल्याशिवाय कोणतीच तडजोड आज पर्यंत झालेले नाही. त्यामुळे जनशक्ती सारख्या आक्रमक संघटनेकडे आकर्षित होऊन आम्ही शेकडो महिलांनी जनशक्ती संघटनेमध्ये प्रवेश केला आहे. येणाऱ्या काळात अशाच पद्धतीने आक्रमक होऊन महिलांसाठी काम करून संघटना तळागाळात पोहोचविणार.

– वंदना पंत

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group