आदिनाथ सहकारी साखर यंदाच्या वर्षी कसल्याही परिस्थितीत चालु करण्यासाठी बागल गट पाटील गटाच्या नेत्याच्या जोरदार हालचाली सुरू
करमाळा प्रतिनिधी आदिनाथ सहकारी साखर कारखाना आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बागलगट पाटील गट शेतकऱ्यासाठी एकत्र येऊन यंदाच्यावर्षी आदिनाथ साखर कुठल्याही परिस्थिती चालू करणार असुन शेतकरी सभासद कामगार सर्व संचालक मंडळांनी आदिनाथ कारखान्याला गत वैभव प्राप्त करून कामाला लागले आहेत.शनिवारी बागल गटाचेवतीने रश्मी बागल यांनी बैठक घेतली आहे. माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी आढावा बैठक घेतली आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चालू करण्याच्या आढावा बैठकीत प्रसंगी बोलताना त्यांनी व्यक्त केले. यावेळी ऊस तोड वाहतुक वाहन करार या संदर्भातही चर्चा झाली. लवकरच आदिनाथ चालू करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करून आदिनाथाच्या कृपाआशीर्वादाने सत्याची लढाई जिंकुन आदिनाथ साखर कारखाना पुन्हा शेतकरी सभासदाच्या कामगारांच्या जोरावर गत वैभव मिळवणार असल्याचे दिसत आहे बागल गटाच्या नेत्या आदिनाथच्या संचालिका सौ. रश्मी बागल आदिनाथ कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे व्हाईस चेअरमन नानासाहेब लोकरे संचालक लक्ष्मण गोडगे दिलीप केकान अविनाश वळेकर नामदेव भोगे प्रकाश झिंजाडे पांडुरंग जाधव स्मिता राजेंद्र पवार बागल गटाचे सर्व संचालक उपस्थित होते.
