करमाळा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष हरिभाऊ( दादा) पांडुरंग जगताप यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुखःद निधन
करमाळा प्रतिनिधी करमाळा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष हरिभाऊ( दादा) पांडुरंग जगताप यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुखःद निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी सकाळी दहा वाजता (रविवार) नगर रोड येथील त्यांच्या शेतामध्ये होणार आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. हरिभाऊ जगताप हे माजी आमदार कर्मवीर अण्णासाहेब जगताप यांचे सुपुत्र तर माजी नगरसेविका तथा वकील संघाच्या अॕड लता पाटील तसेच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शिवराज जगताप यांचे ते वडील होते.
